जाफ्राबाद तालुक्यातील माहोरा येथे भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. भाजप जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर आणि डॉ. कैलास देशमुख यांच्या हॉस्पिटल परिसरात हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जनसंघाचे संस्थापक स्व. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. हे पूजन सरपंच गजानन लहाने, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब जाधव आणि डॉ. कैलास देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी पक्षाच्या ध्येयधोरणांचा आणि प्रवासाचा गौरव केला.
या वेळ गावातील आणि परिसरातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये पंकज जाधव,विक्रम ठाकूर,भगवान वाघ,दिलीप जाधव,अभय जाधव,संतोष गौरकर,बाळासाहेब गव्हले,संजय वाघ,संदीप दांडगे,मंगेश कोरडे,विलास लहाने,शेख यासिन भाई आदी कार्यकर्त्यांचा समावेश होता.
या कार्यक्रमामुळे माहोरा परिसरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.



0 टिप्पण्या