Ticker

6/recent/ticker-posts

माहोरा येथे शिवजयंती उत्साहात साजरी; सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष


 गणेश पगारे 

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. शिवजयंती निमित्त आयोजित या सोहळ्यात महाराजांच्या पूर्णकृती पुतळ्याचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.


मान्यवरांची उपस्थिती आणि पूजन

या कार्यक्रमाला शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दत्तु बोरसे, माहोरा नगर सरपंच गजानन लहाने, जि. म. स. बँकेचे संचालक भाऊसाहेब जाधव, डॉ. मृणाली कासोद, उपसरपंच बाबासाहेब बोरसे आणि माजी सभापती चंद्रकांत चौतमोल,सुरेश बोरसे यांनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन केले.



विद्यार्थ्यांचे कलागुण आणि सजीव देखावा

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध कलागुण ठरले. लिटल इंग्लिश स्कूल आणि के. एस.के. इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबाराचा हुबेहूब सजीव देखावा उभा केला होता.

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पोवाड्यांनी आणि शिवगीतांनी उपस्थितांची मने जिंकली.अनेक विद्यार्थी जिजाऊ माता आणि शिवरायांच्या ऐतिहासिक पोशाखात सहभागी झाले होते, ज्यामुळे परिसरात शिवकालीन वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी नारायण बाबणे, अरुण बोरसे, विमोचन बोरसे, अभिजित थारेवाल,कुलदीप लवंगे, हर्षल जाधव, दादाराव गडकरी, शेख महेमुद भाऊ, बाळासाहेब गव्हले, संतोष गौरकर, गणेश पगारे, आदित्य मुठ्ठे, योगेश औटी, विक्रम ठाकूर, भास्कर जाधव, पंकज जाधव, महेश गव्हले, दुर्गेश वाघ, नवले मॅडम, सौ. सविता लहाने, द्वारकाबाई लहाने, चेतन डुकरे, रवी साळोक, अक्षय कासोद, सागर सिरसाठ आणि अक्षय वाघ यांसह शिवप्रेमी, महिला वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कार्यक्रमाचा शेवट सामुदायिक शिवआरतीने करण्यात आला. शिवजयंती उत्सव समिती आणि माहोरा ग्रामस्थांच्या नियोजनामुळे हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या