गणेश पगारे
भारतीय बौद्ध महासभा, जाफ्राबाद तालुका शाखेच्या वतीने माहोरा (ता. जाफ्राबाद) येथील सम्राट अशोक बौद्ध विहार येथे 'महिला समता सैनिक दला'ची स्थापना अत्यंत उत्साही आणि शिस्तबद्ध वातावरणात करण्यात आली. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त गावातून काढण्यात आलेल्या भव्य रॅलीने संपूर्ण परिसराचे लक्ष वेधून घेतले.
महापुरुषांना विनम्र अभिवादन
कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत मंगलमय वातावरणात झाली. प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
समता सैनिक दलाची भव्य रॅली:
महिला शाखेच्या स्थापनेनिमित्त गावातून समता सैनिक दलाची भव्य रॅली काढण्यात आली. ही रॅली सम्राट अशोक बुद्ध विहार येथून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक, अण्णाभाऊ साठे समाज मंदिर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे मार्गस्थ झाली. "जय भीम" आणि महापुरुषांच्या जयघोषाने संपूर्ण माहोरा परिसर दुमदुमून गेला होता.
मान्यवरांची उपस्थिती
हा सोहळा रविवार, २९ मार्च २०२६ रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जाफ्राबाद तालुका अध्यक्ष बी. एस. साळवे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्ह्याचे सरचिटणीस माधव नरसिंगराव पात्रे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून महिला तालुका अध्यक्षा शारदाबाई हिवाळे यांची विशेष उपस्थिती होती.
माहोरा महिला शाखा कार्यकारिणी जाहीर
या प्रसंगी महिला समता सैनिक दलाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. निवडीचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे:
अध्यक्ष: संध्या बोर्डे,उपाध्यक्ष: जनाबाई बोर्डे,सचिव: लताबाई बोर्डे,सहसचिव: उषाबाई बोर्डे,कोषाध्यक्ष: सविता वाहुळे,सहकोषाध्यक्ष: विमलबाई हिवाळे,संघटक: निर्मलाबाई बोर्डे, वच्छलाबाई गवळी, प्रतिभा बोर्डे, रत्नमाला सावळे, सुमनबाई वाघ, लक्ष्मीबाई लहाने.
सदस्य: सोनाली साळवे, शिला बोर्डे, आम्रपाली बोर्डे, आशा डोंगरदिवे, येणुबाई बोर्डे, कमलबाई इंगळे, लताबाई शेजुळ, मालिका बोर्डे, प्रमिलाबाई काळे, सुरेखा चौतमोल, आशा बोर्डे, सुनिता बोर्डे, अनिता दाभाडे, सुगंधाबाई वाघ, शशिकलाबाई पगारे.
पुरुष सैनिक: अमोल बोर्डे यांची 'पुरुष सैनिक' म्हणून विशेष निवड करण्यात आली.
यावेळी तालुका कार्यकारिणीचे देविदास पैठणे,समाधान मिसाळ,प्रमोद हिवाळे,संजय चव्हाण,श्रीकिसन गायकवाड,उपसरपंच भास्कर सोनवणे,माजी सभापती चंद्रकांत चौतमोल,वंचित बहुजन आघाडी युवक तालुका अध्यक्ष निलेश साळवे,सर्जेराव हिवाळे,तेजराव बनकर,किसन तायडे,राहुल सोनवणे,मिलिंद बोर्डे,विनोद दांडगे,बबन बोर्डे,दीपक मोरे,राजू मगरे,धनंजय गायकवाड, विशाल दांडगे,प्रकाश सोनवणे, संतोष बोर्डे, संदीप साळवे,आकुश बोर्डे प्रदीप बोर्डे अनिकेत काळे विनोद काळे , विनोद दांडगे प्रकाश सोनवणे,विशाल दांडगे,विशाल बोर्डे,साहेबराव बोर्डे,शंकरराव बोर्डे,किरण लोखंडे यांची उपस्थिती होती. अशोक सम्राट मित्र मंडळ आणि माहोरा येथील बौद्ध उपासक-उपासिकांनी हा ऐतिहासिक सोहळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.






0 टिप्पण्या