Ticker

6/recent/ticker-posts

भास्कर सोनवणे यांची माहोरा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड; गावकर्यांमध्ये जल्लोष


गणेश पगारे
 

माहोरा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भास्कर सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सरपंच गजानन लहाने आणि इतर सदस्यांच्या सहमतीने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निवडीनंतर समर्थकांनी पेढे वाटून आणि फटाक्यांची आतिषबाजी करत मोठा जल्लोष साजरा केला.



आज दिनांक २७ मार्च रोजी माहोरा येथे आयोजित विशेष सभेत विस्तारअधिकारी बि. ई. वाघमारे,सरपंच गजानन पा.लहाने, पंचायत अधिकारी रावसाहेब दांडगे, माजी उपसरपंच बाबासाहेब बोरसे यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली. ग्रामपंचायतीत स्पष्ट बहुमत असल्याने भास्कर सोनुने यांचा मार्ग सुकर झाला आणि त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.


विकासाला गती देणार - भास्कर सोनवणे 

निवडीनंतर प्रतिक्रिया देताना, "सरपंच गजानन लहाने, सर्व सदस्य आणि ग्रामस्थांनी जो विश्वास दाखवला आहे, तो सार्थ ठरवेन. गावचा सर्वांगीण विकास करणे आणि गावातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे हीच माझी प्राथमिकता असेल." असे नूतन उपसरपंच भास्कर सोनवणे यांनी सांगितले.


या वेळी ज्येष्ठ नेते भगवानराव लहाने, प्रभाकर शहागडकर, माजी सभापती चंद्रकांत चौतमोल, भानुदास बोर्डे, कैलास लहाने, हर्षल जाधव, सैय्यद मुन्सी, चंद्र सिरसाठ, सुखदेव साबळे, माजी उपसरपंच सैय्यद हबीब सै. कमाल, सैय्यद दिलावर, सुभाषराव देशमुख, दादाराव गडकरी, वामनराव लहाने, सुरेश जाधव, गणेश पगारे, लक्ष्मण वाघ, संतोष बोर्डे, राहुल सोनवणे, संदीप साळवे, नितीन इंगळे, धम्मदीप काळे, साहेबराव बोर्डे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. 


या निवडीमुळे गावात आनंदाचे वातावरण असून, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आता नव्या विकासाला चालना मिळेल, अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या